परांजपे मंडळींचे मुळगाव राजापूर तालुक्यातील आडिवरे हा होय. आडिवरे
गावाहून परांजपे मंडळींचे संक्रमण कोंकणातील इतर गावी झाले. नेवरे, बाकाळे, मुर्डी,
आडे, केळशी, सागावेबुरंबे, कुवेशी, मिठगवाणे, मुटाट, दहिबाव, कोर्ले-धालवली, सुसरी,
मावळंगे, रावले हरचेरी, मालगुंड, निवेली, पालगड, तळवणे, सावंतवाडी, गोमंतक, उत्तरकानडा,
दक्षिण कानडा इत्यादी ठिकाणी जाऊन काही परांजपे स्थायिक झाले. पुढे काही मंडळी देशावर
विविध ठिकाणी गेली.