श्री देव लक्ष्मी नारायण प्रसन्न

दरवर्षी आपण गोकुळाष्टमीचा उत्सव श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर भराडे येथे मोठ्या उत्साहाने साजरा करतो. परंतु सध्या कोरोनाच्या या महाभंकर महामारीमुळे आपण देवळात प्रत्यक्षात गोकुळाष्टमीच्या सोहळ्याचा आनंद घेऊ शकत नाही. परंतु आपली एकत्र येण्याची व उत्सव साजरा होण्याची प्रथा परंपरा कायम रहावी यासाठी परांजपे विश्वस्त मंडळ मुंबई ठाणे शाखेच्या पुढाकाराने यंदा आधुनिक पद्धतीने दिनांक ११ ऑगस्ट २०२० (मंगळवार) रात्री १०-३० वाजता "गुगल मीट" वरती हा उत्सव साजरा करण्याचे योजिले आहे. आपण अशा प्रकारे पहिल्यांदाच आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रूपरेखा खालील प्रमाणे असेल.....!!!!
प्रथम श्री देव लक्ष्मीनारायणाच्या आरतीने कार्यक्रमाची सुरवात होईल.
नियोजित केल्या प्रमाणे आपलेच परांजपे कुटुंबिय विविध भक्ती गीते,वाद्य संगीत सादर करतील.
श्रीकृष्ण जन्म ( पाळणा ) झाल्यावर रात्री बारा वाजता उत्सवाची सांगता होईल.
तरी कृपया समस्त परांजपे कुटुंबिय व परांजपे माहेरवाशिणींच्या कुटुंबातील व्यक्तींनी लॉगिन करुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आधुनिक गोकुळाष्टमी उत्सवाचा लाभ घ्यावा.
अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साज-या होत असलेल्या ह्या उत्सवात सहभागी होणे हे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींसाठी ही एक वेगळी पर्वणीच ठरणार आहे.
कार्यक्रमाची लिंक खालील प्रमाणे असेल.

Meeting URL :- https://meet.google.com/sro-uwjs-uvb
Meeting Code :srouwjsuvb


बरोबर १०-३० वाजता सगळ्यांनी लिंक ओपन करावयाची आहे याची कृपयानोंद घ्यावी.
लिंकवर जोडल्या नंतर करावयाच्या गोष्टी.
१) प्रत्येक कुटुंबात एकाच व्यक्तीने लाॕगिन करुन हा कार्यक्रम लॕपटाॕप / मोठ्या टीव्ही वर पहावा. म्हणजे जास्तीत जास्त जण हा कार्यक्रम बघू शकतील.
२) आपला व्हिडीओ व माईक म्यूट ठेवावा. जेणे करुन फक्त कार्यक्रम सादर करणारीच व्यक्ती आपल्याला पहाता येईल.
ह्या नविन पद्धतीने साजरा होत असलेल्या कार्यक्रमात दिलेल्या सूचनांचे कृपया कटाक्षाने पालन व्हावे. सगळ्यांनी नेहमी प्रमाणेच सहकार्य करावे व कार्यक्रम यशस्वी करावा.
धन्यवाद 🙏