कुलाविषयी सामान्य वृत्त

परांजपे आडनाव चित्तपावन ब्राह्मणांमध्येच आहे. काही परांजपे मंडळीस मंडलीक व देव ही आडनावे पडली. क्षेत्रातील लेखात देव व परांजपे या आडनावांचा संबंध असल्याबद्दलचा स्पष्ट उल्लेख आढळतात. मांडलिकांबद्दल तसे स्पष्ट उल्लेख आढळत नाहीत, तथापि मंडलीक हे मूळचे परांजपे होत, अशी समजूत आहे.

परांजपे यांचे गोत्र विष्णुवृद्ध, वेद ऋग्वेद, सूत्र आश्वलायन, शाखा शाकल. विष्णुवृद्ध गोत्राचे आडगिरस, पौरुकुत्स्य, त्रासदस्यव, असे तीन प्रवर आहेत. विष्णुवृद्ध गोत्रांची आडनावे - किडमिडे (मेहेंदळे), देव (परांजपे), नेने, परांजपे, बेंडे (मेहेंदळे), मंडलीक (परांजपे) आणि मेहेंदळे. गोत्र व प्रवर यांचा उच्चार संध्या, विवाह, व यज्ञकर्म या प्रसंगी करावा लागतो. गोत्रप्रवरांचे विवेचन श्रौतसूत्रे, महाभारत-शांतिपर्व, निर्णयसिंधु, धर्मसिंधू, संस्काररत्नमाला इत्यादी ग्रंथात केलेले आहे.