परांजपे घराण्याचे कुलदैवत - श्री लक्ष्मीनारायण, भराडे
परांजपे घराण्याचे कुलदैवत असलेल्या श्री देव लक्ष्मीनारायणाचे मंदिर राजापूर तालुक्यातील (जिल्हा रत्नागिरी) वाडा भराडे व मोगरे यांचे हद्दीवर आहे.
श्री देव लक्ष्मीनारायणाचे मूर्ती शाळीग्राम शिळेची असून सुमारे दोन फूट उंच आहे. श्री नारायण गरुडाचे मस्तकावर डावी मांडी मोडून बसलेले आहेत. त्यांचे डावे मांडीवर श्री लक्ष्मी उजवी मांडी मोडून बसलेली आहे. खाली दोन्ही बाजूस दोन द्वारपाल आहेत. मूर्ती चतुर्भुज आहे. वरच्या उजव्या हातात चक्र, खालच्या उजव्या हातात शंख, वरचे डावे हातात गदा, तर खालचे डाव्या हातात पद्म आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ असून मस्तकावर नागाचा फणा आहे.श्री देव लक्ष्मीनारायणाचे मूर्ती शाळीग्राम शिळेची असून सुमारे दोन फूट उंच आहे. श्री नारायण गरुडाचे मस्तकावर डावी मांडी मोडून बसलेले आहेत. त्यांचे डावे मांडीवर श्री लक्ष्मी उजवी मांडी मोडून बसलेली आहे. खाली दोन्ही बाजूस दोन द्वारपाल आहेत. मूर्ती चतुर्भुज आहे. वरच्या उजव्या हातात चक्र, खालच्या उजव्या हातात शंख, वरचे डावे हातात गदा, तर खालचे डाव्या हातात पद्म आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ असून मस्तकावर नागाचा फणा आहे.