परांजपे कुलवृत्तांताचा इतिहास

सन १९३४ मध्ये पहिला कुलवृत्तांत - ग्रंथ प्रसिद्ध झाला. श्री. विष्णू विनायक परांजपे हे या आवृत्तीचे संपादक होते.

१९५८ दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी बऱ्याच संस्था व व्यक्ती यांचे साह्य झाले. या आवृत्तीचे देखील श्री. विष्णू विनायक परांजपे हेच संपादक होते.

श्री. पांडुरंग द. परांजपे व कै. वामन रामचंद्र परांजपे ह्यांच्या सहकार्यांनी परांजपे कुलवृत्तांत समितीने कुलवृत्तांताचे काम पूर्णत्वास नेले व इ. स. २००१ मध्ये कुलवृत्तांताची तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

वंशावळींमधे वेळोवेळी होत जाणाऱ्या बदलांना समाविष्ट करण्यासाठी वारंवार कुलवृत्तांताच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित करणे अव्यवहार्य असल्याने २०१२ मध्ये यापुढे कुलवृत्तांताची छापील आवृत्ती प्रकाशित न करता संगणकीय आवृत्ती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.