विश्वस्त मंडळाची स्थापना

दिनांक २४ मार्च १९७४ रोजी सकाळी ९ वाजता गायवाडी, गिरगाव, मुंबई येथे परांजपे मोतीवाले यांचे घरी "परांजपे मंडळाची" स्थापना झाली. मंडळाच्या स्थापना सभेचे अध्यक्ष श्री अनंत नारायण परांजपे होते.
सचिव म्हणून श्री. भालचंद्र नरहर (आबा), संस्थापकांपैकी एक, कै. श्री. पांडुरंग दत्तात्रय (राजाभाऊ), श्री. अशोक सीताराम यांनी कामे केली.
खजिनदार म्हणून डॉ. ग. भा. परांजपे, कै. ग. म. परांजपे, तसेच कै. श्री. प्रभाकर नारायण यांनी जानेवारी १९८८ पासून २००७ पर्यंत कामे केली.
श्री. दिलीप दत्तात्रय, चार्टर्ड अकाउंटंट ह्यांनी मंडळाचे १९७६ पासून हिशेब तपासनीस तसेच मंडळाचे सल्लागार म्हणून काम बघितले.

दिनांक ३ मार्च २००३ रोजी "परांजपे विश्वस्त मंडळ - मध्यवर्ती न्यासाची" स्थापना करण्यात आली (रजि. नं. २११८८ (मुंबई)).
स्थापनेच्या वेळेस श्री. शंकर विनायक परांजपे हे अध्यक्ष तर श्री. अरविंद हरी परांजपे हे उपाध्यक्ष होते. विश्वस्त मंडळामध्ये एकूण अकरा विश्वस्तांचा समावेश होता. त्यामध्ये वेळोवेळी बदल होत जाऊन विद्यमान विश्वस्त मंडळ खालीलप्रमाणे आहे:

१. श्री. विजय परांजपे - अध्यक्ष
२. श्री. जयंत परांजपे - उपाध्यक्ष
३. श्री. संजय परांजपे - सचिव
४. श्री. नितीन परांजपे - कोषाध्यक्ष
५. श्री. सदाशिव परांजपे - विश्वस्त
६. श्री. अभय परांजपे - विश्वस्त
७. श्री. आशिष परांजपे - विश्वस्त
८. श्री. ओंकार परांजपे - विश्वस्त