श्री लक्ष्मीनारायण मंदिर, भराडे येथे पोहोचण्यासाठी गोवा महामार्गावरील राजापूर येथून
येता येते. अंतर साधारण २७-२८ कि. मी. आहे. राजापूरहून ST बस अथवा खाजगी वाहतूक करणारी
वाहने मिळू शकतात.
येण्यासाठीचा दुसरा मार्ग म्हणजे रत्नागिरी - पावस - आडिवरे हा मार्ग. अंतर रत्नागिरीहून
४५ कि. मी. आहे.
भराडे येथे भक्त निवासामध्ये राहण्याची तसेच जेवणाची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी
पूर्वसूचना दिलेली उत्तम.
भक्तनिवासामध्ये निवासासाठी एका खोलीसाठी नाममात्र शुल्क रु. १०० आकारले जाते ज्यामध्ये ४ व्यक्ती राहू शकतात.
निवासाची सोय फक्त परांजपे, मंडलिक, देव यांच्यासाठीच उपलब्ध आहे.
निवासाबरोबरच घरगुती भोजनाची सुविधा रु. ५० मध्ये उपलब्ध आहे. तसेच अत्यल्प दरामध्ये नाश्त्याची सोय देखील होऊ शकते.
|
श्री. ठाकूरदेसाई
व्यवस्थापक, भक्त निवास,
श्री लक्ष्मीनारायण मंदिर, भराडे
02353 226477
|
श्री. चारुहास पाध्ये
पुजारी, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, भराडे
02353 226413
|
|