गोपनीयता धोरण
Privacy Policy
या संकेतस्थळाचा वापर करीत असताना Unique Solutions, Pune तसेच परांजपे विश्वस्त मंडळ, आपल्याकडून आपली माहिती कशा प्रकारे जमा करू शकेल तसेच त्या माहितीचा कोणत्या कारणांसाठी उपयोग करू शकेल, हे या privacy policy मध्ये नमुद केलेले आहे.
आपल्या माहितीचा गैरवापर केला जाणार नाही यासाठी Unique Solutions, Pune तसेच परांजपे विश्वस्त मंडळ आपल्याला आश्वस्त करीत आहेत.
ही privacy policy आपल्या मर्जीनुसार बदलण्याचा अधिकार Unique Solutions, Pune तसेच परांजपे विश्वस्त मंडळ यांनी राखून ठेवलेला आहे, त्यामुळे कृपया ही privacy policy वरचेवर बघत राहावी असे आवाहन केले जात आहे. ही privacy policy दि. १ ऑगस्ट २०१८ पासून लागू आहे.
आपली कोणती माहिती जमा केली जाईल?
  • संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख फोन क्र. ई-मेल पत्ता, परांजपे कुळातील घराणे.
  • आपल्या ओळखपत्राची प्रत (डिजिटल स्वरूपात)
  • आपल्या कुटुंबीयांची माहिती - संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख फोन क्र. ई-मेल पत्ता
  • कुटुंबियांशी असलेले नाते. लग्नाच्या तसेच मृत्यूच्या तारखा
  • प्रत्येक सदस्यांची वैयक्तिक माहिती.
  • वरील माहिती जमा करण्यासाठी वेगवेगळे अर्ज दिलेले आहेत जे तुम्ही स्वतः भरावयाचे आहेत.
    याखेरीज तुमचा IP Address, तुम्ही वापरत असलेल्या browser ची माहिती ह्या गोष्टी देखील जमा केल्या जाऊ शकतात.
वरील माहितीचा काय उपयोग केला जाऊ शकेल?
  • या संकेतस्थळाच्या निर्माणाचा मूळ उद्देश हा जमा केलेल्या माहितीच्या आधारे परांजपे घराण्याच्या वंशावळी तयार करणे हा आहे, त्यानुसार आपण पूर्ण माहिती पुरविल्यास आपले तसेच आपल्या कुटुंबीयांची नावे वंशावळीमध्ये संलग्न करण्यात येतील.
  • आपण नोंदविलेल्या संपर्क माहितीचा उपयोग (पत्ता, फोन क्र., ई-मेल इ.) खाली दिलेल्या कारणांसाठी केला जाऊ शकतो.
  •      - परांजपे विश्वस्त मंडळाकडून आपल्याला संपर्क करण्यासाठी
         - आपल्याला तसेच आपल्या कुटुंबियांना शुभेच्छा तसेच शोक संदेश पाठविण्यासाठी
         - आपण आवश्यक ती माहिती पूर्ण न नोंदविल्यास, ती माहिती पूर्ण करण्यासाठीचे आवाहन / निवेदन / आठवण करण्यासाठी
माहितीची सुरक्षितता / गुप्तता
  • आपण नोंदविलेली संपर्क माहिती, जन्मतारीख इ. इतर सभासदांपासून गुप्त ठेवण्यासाठी सोय दिलेली आहे त्याचा वापर केल्यास ही माहिती इतर सभासदांना दिसू शकणार नाही.
  • आपण नोंदविलेली माहिती ही Unique Solutions, Pune तसेच परांजपे विश्वस्त मंडळ यांना उपलब्ध असेल.