सभासद नोंदणीसाठी काही शुल्क आहे का?
नाही. कुलवृत्तांत सभासद नोंदणीसाठी काहीही शुल्क नाही.
सभासद नोंदणी केली आहे परंतु OTP प्राप्त झाला नाही. काय करावे?
थोडी वाट बघावी. OTP चा SMS अथवा ई-मेल साठी कदाचित ५-१० मिनिटांचा अवधी लागू शकतो.
OTP ने सभासदत्व प्रमाणित करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. जर वाट पाहून देखील
OTP प्राप्त झाला नाही तर आपण नोंदविलेल्या ई-मेल वरून webadmin@paranjapevishwastamandal.com
ला तसे कळवावे.
मी परदेशात राहतो. नोंदणी कशी करावी?
आपण परदेशात राहत असाल तर नोंदणी करताना तिकडचा मोबाईल क्र. नोंदवू नये. OTP चा SMS
मिळणार नाही. फक्त ई-मेल द्यावा व नोंदणी करावी.
नाव मराठीमध्ये रूपांतरित होत नाही. काय करावे?
आपण जर मोबाईल मधील web browser वापरत असाल तर कदाचित मराठीमध्ये रूपांतरित होणार नाही,
त्यासाठी मोबाईल मधील मराठी कीबोर्ड चा वापर करावा.
माझे अथवा माझ्या वडिलांचे नाव २००१ च्या कुलवृत्तांतामध्ये आहे, तरीसुद्धा मी सभासद
व्हावे का?
अवश्य व्हावे. २००१ च्या कुलवृत्तांतानुसार सर्व घराण्यांच्या वंशावळी जरी तयार करण्यात
आलेल्या असल्या तरी त्यामध्ये माहिती चा भाग काहीही नाही. त्यामुळे तुम्ही सभासद होऊन
स्वतःबद्दल तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती भरणे अपेक्षित आहे. शिवाय त्यामुळे
आपल्या
माहितीमध्ये वेळोवेळी होणारे बदल देखील तुमचे तुम्हीच करू शकाल. याखेरीज आधीच्या कुलवृत्तांतामध्ये
स्त्रियांची नोंद नाही, ती तुम्ही सभासद नोंदणी करून करू शकता.
माझ्या भावाने सभासद नोंदणी केली आहे. मी करावी काय?
नाही. तुमचा भाऊ त्यांच्या लॉगिन मधून तुम्हाला सदस्य बनवू शकतो व आवश्यकता भासल्यास
तुमचे वेगळे लॉगिन तयार करू शकतो. तुम्ही वेगळी सभासद नोंदणी केल्यास माहिती सदस्यांच्या
माहितीच्या वेगवेगळ्या आवृत्त्या तयार होतील.
|